पुणे - जो विषय समाजात निषिद्ध आहे आणि त्याच्यात कोणी चुकीचं वागत असेल तर पोलिसांनी त्यांच्यामध्ये कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई फक्त एकाच केसपूर्ती मर्यादित राहणार नाही तर ते कसं थांबवता येईल किंवा मर्यादित करता येईल या बाबतचे आमचे प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया पॉर्न प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. सरहद संस्थेच्यावतीने कारगील विजय दिनानिमित्त कारगील गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पेगासेस प्रकरणी तपास सुरू केला आहे -
पेगासेस प्रकरणाची बाधा फक्त राज्याला न होता जगातील विविध देशांना झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार आम्ही देखील चौकशी सुरू केली आहे. खरी वस्तुस्थिती लवकरच समोर येईलस, असे यावेळी वळसे पाटील म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापणाने काम करायला हवं -
राज्यस्तरावर आपत्ती व्यवस्थापन सारखी एक टीम नेहमीच काम करत असते. घटना घडल्यावर अश्या प्रकारची आपत्ती व्यवस्थापन सुरू होण्याऐवजी अश्या घटना घडू नये यासाठी काम करायला पाहिजे.आणि त्यादृष्टीने मंत्रिमंडळात आम्ही आग्रह करू, असेही त्यांनी सांगितले.
लवकरच तळीये गावाचा पुनर्वसन करणार -
अश्या घटना ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेस बरीच चर्चा होत असते. परंतु नंतर त्याचे नियोजन करायला पाहिजे, ते होत नाही. सरकारकडे दरड प्रमाण भागाचा अभ्यास असतो. मात्र काल जी घटना घडली आहे तो भाग दरडप्रमाण भाग नव्हता. तरीसुद्धा तिथं दगड कोसळण्याची घटना घडली. अनेक लोकांच्या जिवतेला हानी झाली. माळीणला ज्या वेळेला घटना घडली होती. तेव्हा लगेच रेस्क्यू करणे आणि लोकांना स्थिर सावरणे हा एक भाग होता आणि दुसरं म्हणजे माळीणच्या पुनर्वसनाचा भाग जो हाती घेतला होता तो पूर्ण केला आहे. अश्याच पद्धतीची भूमिका गृहनिर्माण मंत्री यांनी घेतली आहे. त्या गावाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.