ETV Bharat / state

कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

अत्यावश्यक सेवा बजावत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लढणाऱ्या योद्ध्यांना भारतील सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली.

सन्मान करताना
सन्मान करताना
author img

By

Published : May 3, 2020, 3:33 PM IST

पुणे - देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात सगळे घरी असताना अत्यावश्यक सेवेतील अनेक जण आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धे आहेत. दरम्यान, त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण देशभरात विमान, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करत कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. पुण्यातही कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे मेजर जनरल नवनीत कुमार यांनी सांगितले. तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचा त्यांनी विशेष गौरव केला.

विभागीय आयुक्त कार्यालयात प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मेजर जनरल नवनीत कुमार म्हणाले, कोरोनाच्या लढाईतील यौध्दांना बळ देणे हे आपले कर्तव्य असून पुणे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या 22 जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी सतत कार्यरत आहेत. सोबतच लॉकडाऊनच्या काळात शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी देखील अत्यंत समन्वयाने कार्य करत आहेत. या सेवा देणाऱ्या कोरोना सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - पुणे विभागात 3 हजार क्विंटल अन्नधान्याची आणि 4 हजार 483 क्विंटल भाजीपाल्याची आवक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.