ETV Bharat / state

अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न भाजप सोडवेल - चंद्रकांत पाटील - पुणे जिल्हा बातमी

ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ. डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी आज (दि. 16 जाने.) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

चंद्राकांत पाटील
चंद्राकांत पाटील
author img

By

Published : Jan 16, 2021, 10:20 PM IST

Updated : Jan 16, 2021, 10:33 PM IST

पुणे - भाजपसह ज्यू समुदाय सतत संबंधित राहिला आहे. आता प्रत्यक्ष कार्यरत होत आहे. ही आनंदाची बाब असून अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्षच सोडवेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ. डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी आज (दि. 16 जाने.) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

बोलताना चंद्रकांत पाटील

पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल

भारतीय जनता पक्ष हा देशातील, जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपचे राज्य आहे. अशा पक्षा सोबत ज्यू समुदायाचे नाते जोडले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पक्षाची सदस्य संख्या, जनाधार सतत वाढत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल याची खात्री अशा कार्यक्रमांमधून होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपशी ज्यू समुदाय सतत संबंधित राहिला आहे. आता प्रत्यक्ष कार्यरत होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सॉलोमन सोफेर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची वेगवान प्रगती झाली. आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलो तरी या प्रयत्नांबद्दल आम्हाला आस्था आहे. ज्यू अल्पसंख्य समुदायाला प्रथमच कोणीतरी राजकीय पक्षाने मुख्य प्रवाहात येण्याचे निमंत्रण दिले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

हेही वाचा - भाजप महिला आघाडीकडून सोमवारपासून राज्यभर आंदोलन - चंद्रकांत पाटील

Last Updated : Jan 16, 2021, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.