पुणे - शिवसेनेला दिलेल्या मुदतीमध्ये शिवसेना समर्थनाची यादी राज्यपालांना देऊ शकली नाही. त्यामुळे राज्यात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षात राज्यपालांची भूमिका काय असणार? राज्यपाल नेमके कुठले निर्णय घेणार? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकंदरितच राज्यपालांच्या पुढील निर्णय संदर्भामध्ये काय बाबी असू शकता यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ आणि घटनातज्ञ भास्करराव आव्हाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपली मते मांडली.
हेही वाचा - पुण्यात गॅस कटरने एटीएम फोडून ११ लाख रुपये लंपास
महाराष्ट्रात अजूनही राष्ट्रपती राजवटीची शक्यता कमी आहे. येत्या एक दोन दिवसातील घडामोडी महत्वाच्या आहेत. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनाची यादी घेऊन गेल्यास राज्यपाल संधी देऊ शकतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला ही बोलावू शकतात, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले आहे त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.