ETV Bharat / state

प्रेम, आत्महत्येचा प्रयत्न, अतिदक्षता विभागात लग्न आणि....

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीसोबत रुग्णालयातच लग्न करून नतंर तरुण फरार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये घडली. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणाने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

The boy escaped the girl afetr  marrying her in hospital
प्रेम, आत्महत्येचा प्रयत्न, अतिदक्षता विभागात लग्न अन्...
author img

By

Published : Dec 6, 2019, 8:34 PM IST

Updated : Dec 6, 2019, 8:47 PM IST

पुणे - आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीसोबत रुग्णालयातच लग्न करून नतंर तरुण फरार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये घडली. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणाने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रेम, आत्महत्येचा प्रयत्न, अतिदक्षता विभागात लग्न आणि....

हेही वाचा - हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरुणींची मतं...

मूळची बुलडाणा जिल्ह्यातील सध्या चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या 26 वर्षीय पीडित तरुणीची सूरज नलावडे नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या वर्षी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सूरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. या काळात संबंधित तरुणीने सूरजकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, एका जातीचे नाही, असे सांगत तो तिला भेटण्याचे टाळू लागला.

त्याने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, याबाबत काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना माहिती मिळाल्यानतंर त्यांनी संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र, लग्नाचे सोपस्कार पार पडताच तरुणाने तिथून धूम ठोकली. या प्रकरणी बुधवारी पोलिसांनी सूरज भारत नलावडे याच्यावर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:Anc_लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने एका तरुणीवर वर्षभर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाला तगादा लावताच संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला. नकार ऐकताच तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही संघटनांच्या दबावामुळे संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र लग्न लागताच तरुणाने तिथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार काही दिवसांपूर्वी चाकण येथे घडला असून आता या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील व सध्या चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या सव्वीस वर्षीय पिडीत तरुणीने चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी बुधवारी सुरज भारत नलावडे याच्यावर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, सबंधित पिडीत तरुणी चाकण येथे तिच्या मैत्रिणी बरोबर आंबेठाण चौकात राहत असताना सुरज व त्या पिडीतेची गेल्या वर्षी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सुरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले दरम्यानच्या काळात संबंधित तरुणीने सुरज याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता आपण एका जातीचे नाही, असे म्हणून तिला भेटण्याचे टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणी हवालदिल झाली.

पिडीत तरुणीवर अन्याय झाल्याचे आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीना कळाले. त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीच्या सोबत संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले होते. मात्र संघटनेच्या दबावातून रुग्णालयातील लग्नाचे सोपस्कार पार पडताच संबंधित तरुणाने धूम ठोकली.

सबंधित पिडीत तरुणीने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून येथील पोलिसांनी सुरज नलावडे याच्या विरोधात भा.द.वि.कलम 376 अन्वये अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम (2), (व्ही.ए.), 3 ), (1) (आर.), (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Byte__प्रकाश राठोड पोलीस उपनिरीक्षक चाकणBody:....Conclusion:
Last Updated : Dec 6, 2019, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.