ETV Bharat / state

इंदापूर अकलूज रोडवर भीषण अपघात, पती-पत्नी जागीच ठार

author img

By

Published : Jan 3, 2021, 9:33 PM IST

इंदापूर अकलूज रोडवरील विठ्ठलवाडी येथे आज ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला.

इंदापूर अकलूज रोडवर भीषण अपघात
इंदापूर अकलूज रोडवर भीषण अपघात

बारामती - इंदापूर अकलूज रोडवरील विठ्ठलवाडी येथे आज ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पांडुरंग सिताराम ताथवडे (वय 58 वर्षे) व रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्षे) दोघे राहणार खडकी पुणे, मूळ गाव केंदूर पाबळ ता. शिरूर जि. पुणे) हे दांपत्य जागीच ठार झाले. अपघाताची भीषणता एवढी होती की कारचे पत्रे तोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढावे लागले.

वळणावर झाला अपघात-

यासंदर्भात इंदापुरातील रुग्णवाहिका चालक नितीन पांडुरंग खिलारे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. आज सकाळी खिलारे हे त्यांची रुग्णवाहिका घेऊन अकलूजकडे जात असताना इंदापूर अकलूज रोडवर विठ्ठलवाडी नजीक एका वळणावर टाटा कंपनीचा ट्रक आणि टाटा कंपनीची नेक्सॉन यामध्ये अपघात झाला. ट्रकचालक अपघात होताच फरार झाला.

ट्रक चालकावर गुन्हा दाखल-

कारमधील ताथवडे दांपत्य जागीच ठार झाले होते. यानंतर खिलारे यांनी रुग्णवाहिका थांबवून पोलिसांना फोन केला व सर्व माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान या घटनेप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

हेही वाचा- देशात दोन कोरोना लसींना मान्यता देणारे औषध महानियंत्रक परभणीचे भूमिपुत्र !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.