ETV Bharat / state

शॉर्टसर्किटमुळे दोन एकरातील ऊस जळाला, आंबेगावच्या अवसरीतील घटना

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर शेतातील ऊस जळाला आहे. नुकसान भरपाई मिळावी व महावितरणच्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

जळालेला ऊस
जळालेला ऊस
author img

By

Published : Dec 22, 2020, 7:56 PM IST

Updated : Dec 22, 2020, 10:08 PM IST

आंबेगाव (पुणे) - तालुक्यातील अवसरी खुर्द येथील खडकमळा येथे विद्युत तारांची दुरूस्ती करताना शॉर्टसर्किट होऊन जवळच असणाऱ्या उसाला आग लागल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी व महावितरणच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारईवा करावी, अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.

विद्युत वाहिनीचे काम सुरू असताना लागली आग

अवसरी खुर्द येथील खडकमळा येथे मानसिंग शिंदे यांचा दोन एकर शेतातील ऊस काढणीला आला होता. ऊस तोडीच्या प्रतिक्षेत असताना मंगळवारी (दि. 22 डिसें.) दुपारी उसाच्या शेताजवळच महावितरणचे कर्मचारी विद्युत वाहिनीचे काम करत होते. त्याच दरम्यान ऊस शेतीवरुन गेलेल्या तारांमधून ठिणगी पडली. त्यानंतर अचानक उसाला आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. या ऊस जळून खाक झाला आहे.

नुकसानीचा पंचनामा

मानसिंग शिंदे यांच्या ऊसशेतीचा तलाठी व भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने पंचनामा करण्यात आला आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याची मागणी मानसिंग शिंदे यांनी केली.

हेही वाचा - पर्वतीमागील जंगलात नेत मित्रानेच केला मैत्रिणीवर बलात्कार, आरोपी अटकेत

हेही वाचा - डॉ.रघुनाथ माशेलकर यांना अटल सांस्कृतिक गौरव पुरस्कार.. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार वितरण

Last Updated : Dec 22, 2020, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.