ETV Bharat / state

भीमा नदीवर बुडीत बंधारे बांधणार, निविदा तयार - आमदार राहुल कुल - बुडीत बंधारे भीमा नदी

अर्थसंकल्पीय अधिवेशनातही १३ मार्च २०२० ला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, बुडीत बंधारे बांधण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली असून, दौंड तालुक्यातील आवश्यक त्याठिकाणी बंधारे बांधण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यानंतर या समितीच्या शिफारसीनुसार बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे ही कुल यांनी सांगितले.

duand pune latest news  pune latest news  bhima river submerged dams  bhima river news  बुडीत बंधारे भीमा नदी  भीमा नदी
आमदार राहुल कुल
author img

By

Published : Apr 21, 2020, 12:19 PM IST

पुणे - भीमा नदीवरील बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील देऊळगाव राजे, कर्जत तालुक्यातील औटेवाडी, श्रीगोंदा तालुक्यातील सिद्धटेक याठिकाणी भीमा नदीवर बुडीत बंधारे बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठीची निविदा सूचना आज जाहीर करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील देऊळगावराजे, पेडगाव, वाटलूज, हिंगणीबेर्डी, नायगाव, राजेगाव व खानोटा या भागातील शेतकऱ्यांची शेतीची सिंचन योजना व पाणी पुरवठा योजना उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून आहेत. उजनी जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांना पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांनाची लांबी वाढून पाणी घ्यावे लागते. तसेच हे पाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी शेतीला व पिण्याला पाणी उपलब्ध नसते, अशी परिस्थिती तालुक्यातील या भागात होत असल्याचे आमदार राहुल कुल यांनी वारंवार होणाऱ्या बैठकांमध्ये नमूद केले होते. तसेच आमदार कुल यांनी बुडीत बंधारे करण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरत विधानसभेत यापूर्वी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला होता. त्यानुसार बैठक होऊन भीमा नदीत बुडीत बंधारे करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला होता.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही १३ मार्च २०२० ला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, बुडीत बंधारे बांधण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली असून, दौंड तालुक्यातील आवश्यक त्याठिकाणी बंधारे बांधण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यानंतर या समितीच्या शिफारसीनुसार बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे ही कुल यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.