ETV Bharat / state

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानधिष्ठीत भूमिका निर्माण होणे गरजेचे - शरद पवार - शरद पवारांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होऊन त्यांच्यामध्ये विज्ञानधिष्ठीत भूमिका निर्माण झाली पाहिजे. जगातील कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विज्ञानानेच ते शक्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

sharad pawar
शरद पवार
author img

By

Published : Jun 16, 2022, 7:40 PM IST

बारामती(पुणे) - देशाच्या शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होऊन त्यांच्यामध्ये विज्ञानधिष्ठीत भूमिका निर्माण झाली पाहिजे. जगातील कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विज्ञानानेच ते शक्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. बारामती कृषि विज्ञान केंद्रावर राज्य शासनाचे राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन व टाटा ट्रस्टच्या संयुक्तपणे उभारलेल्या सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्र अनिल काकोडकर, अदानी फाऊंडेशनचे प्रमुख उद्योजक गौतम अदानी, त्यांच्या पत्नी प्रिती अदानी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, तरुण शास्त्रज्ञ गोपालजी, विवेक सावंत, रयतचे चेअरमन अनिल पाटील, डॉ. सी. डी. माळी, सुप्रभाता चौधरी, आमदार रोहित पवार यावेळी उपस्थिती होते.

पवार पुढे म्हणाले, बारामती येथील सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटर देशातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे आहे. विज्ञानासंबंधी त्यांच्यात आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने हाती घेत अल्पावधीत तो पूर्णत्वाला नेला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी येते भेट दिल्यावर त्यांच्या ज्ञानात, अौत्सुक्यात भर पडेल. जीवनात पुढे जायचे असेल तर विज्ञानवादी भूमिका स्विकारावी लागेल. भाकड समजूती, खोटेपणाने मन तयार होत नाही. विज्ञानावर आधारित ज्ञान मिळविले तरच जीवनात यश मिळू शकेल. मनुष्य विज्ञानाच्या बदलामुळेच चंद्र, मंगळावर जावू शकला. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीची अत्यंत गरज आहे. तो पाया या केंद्राच्या माध्यमातून मजबूत होईल असे पवारांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.