बारामती- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे दीड वर्षापूर्वी एका दुचाकी चालकाला आडवून त्याच्याकडील पन्नास किलो मानवी डोक्याच्या केसांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महेश निंबाळकर (रा.शेळगाव ता.इंदापूर ) यांनी फिर्याद दिली होती. वालचंदनगर पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेल्या मालापैकी १ लाख ९० हजार रुपये रोख व १२ किलो केस निंबाळकर यांना परत केले आहेत.
दमदाटी करून ५० किलो केस लंपास...
इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील महेश सुभाष निंबाळकर हे गावोगावी फिरून केसावरती भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. मागील वर्षी १८ जुलै रोजी निंबाळकर हे इंदापूर- बारामती रस्त्याने ५० किलो केस घेऊन बारामतीकडे विक्रीसाठी निघाले होते. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास लासुर्णे येथील चिखली फाटा येथे निंबाळकर यांना अनोळखी चोरांनी अडवड दमदाटी करुन ५० किलो केस लंपास केले होते.
सहा आरोपी अटकेत....
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व प्रकाश माने यांनी सदर घटनेचा तपास करून त्या अनोळखी चोरांचा शोध घेतला. तपासाअंती पोलिसांनी मयूर उर्फजुल्या मोहन पाटोळे (रा. निमगाव केतकी), शंकर उमाजी बोडरे (रा.फोंडशिरस ता. माळशिरस), विजय मल्हारी जाधव (रा. धर्मपूरी, ता.माळशिरस), सुनिल उर्फ सोन्या तायाप्पा शिंदे व लक्ष्मण मारुती वाघमोडे (रा. दोघे, शेळगाव) अशा सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १२ किलो केस व १ लाख ९० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
हेही वाचा- शिवसेना पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार - आढळराव पाटील
हेही वाचा- मौज मजेसाठी १८७ पंचतारांकित हॉटेलची फसवणूक; महागड्या दारूसह पसार होणाऱ्या भामट्यास अटक