ETV Bharat / state

Shivaji Statue On Indo Pak Border: भारत-पाक सीमेवर उभारणार शिवरायांचा पुतळा; पुणेकरांकडून पुतळ्याचे पूजन

author img

By

Published : May 18, 2023, 4:38 PM IST

सीमेवरील जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत, यासाठी 'आम्ही पुणेकर' संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट 'भारत-पाक'च्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे आणि 'आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.

Shivaji Statue On Indo Pak Border
शिवरायांचा पुतळा

पुणे: 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणा' देत ढोल-ताशांच्या गजरात निघालेली शिवरायांची पालखी... पालखीवर होणारी फुलांची उधळण... वीर पत्नींच्या हस्ते शिवरायांची आरती...बाईकर्सने शिवरायांना दिलेली मानवंदना..अशा स्फूर्तीदायी आणि भारावलेल्या वातावरणात काश्मीरमध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन आणि आरती काल (बुधवारी) करण्यात आली.

शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन: 'आम्ही पुणेकर' संस्थेच्या वतीने पुण्याई पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. यावेळी काश्मीर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १० फूट पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

'या' मान्यवरांचा सत्कार: ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर, दुर्गसंवर्धक श्रमिक गोजमंगुडे, वैशाली व रूपाली हॉटेल प्रमुख विश्वजीत जाधव, पुरातत्त्व विभाग सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने आदी मान्यवरांना पुण्याई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुलांना धर्माचे महत्त्व शिकवा: गो. बं. देगलूरकर म्हणाले, धर्मसंस्था संरक्षित व्हावी, टिकावी यासाठी आपण काय करतो याचा विचार करायला हवा. सनातन धर्म हा सगळ्यात प्राचीन धर्म आहे. यामध्ये नित्यनूतन भर पडते आहे. मुलांना केवळ रामरक्षा शिकवून उपयोग नाही तर धर्माचे महत्त्व त्यांना शिकवायला हवे. आपला धर्म आणि देश गौरवान्वित करण्यासाठी महाराजांचे कर्तृत्व आपल्यासमोर पाहिजे. महाराजांसमोर नतमस्तक होऊन मूर्ती घेऊन आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे तरच देश आणि धर्म टिकेल, असेही त्यांनी सांगितले.

शिवरायांचे हिंदुत्व हेच भारताचे राष्ट्रीयत्व: पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला शोभेल असा हा कार्यक्रम आहे. काश्मीरमध्ये जवानांना प्रेरणा देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुण्यातील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला ही पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. २० व्या शतकात कोणत्याही लोकशाही राष्ट्राला अभिमान वाटावा, असे राष्ट्र शिवाजी महाराजांनी निर्माण केले. छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व हेच भारतीयांचे राष्ट्रीयत्व आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

  1. Reel Shooting On Bike: धावत्या दुचाकीवर आंघोळीचा 'रील' शूट करणे तरुण-तरुणीच्या अंगलट; जाणून घ्या रिलस्टारचा काय आहे प्रकरण
  2. Nana Patole Criticized BJP: राज्यात माणुसकीचे रक्तपात करण्याचे काम सुरू- अकोला दंगलीवरून नाना पटोले यांची भाजपवर टीका
  3. Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा मंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.