ETV Bharat / state

पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

author img

By

Published : Oct 21, 2021, 1:25 AM IST

Updated : Oct 21, 2021, 1:44 AM IST

रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणासाठी ओळखल्या जातात. आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी मिळाली. त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले.

rupali chakankar
रुपाली चाकणकर

पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. तर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर ईटीव्ही भारत प्रतिनिधीने रूपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने रूपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला

महिलांसाठी विविध योजना सुरू करणार -

रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणासाठी ओळखल्या जातात. आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी मिळाली. त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आता आक्रमकपणा न दाखवता पीडितेला लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने महिलांच्या सुरक्षितेसाठी विविध योजना देखील सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे, असा विश्वास यावेळी रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

वहिनींनी आपली कला जोपासावी -

नुकताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका करत माजी गृहमंत्री हे पिकनिकला गेले आहे, अशी टीका केली होती. त्यावर वहिनी यांनी आपली गायन कला चांगल्या पद्धतीने जोपासावी आणि तिथं लक्ष दिलं तर नक्कीच आमच्या त्यांना शुभेच्छा असणार आहे, असे प्रत्युत्तर यावेळी चाकणकर यांनी दिले.

Last Updated : Oct 21, 2021, 1:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.