बारामती - बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोनेश्वराची यात्रा कोरोनामुळे साधेपणाने साजरी करण्यात आली. येथील पुरातन सोनेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. या यात्रेला पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून पन्नास हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी मात्र बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने व प्रशासनास सहकार्य करण्याच्या दृष्टीने सोनेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा - मुंबई : कंगनासह चार जणांवर पुन्हा गुन्हा दाखल, वाचा...
यात्रा साधेपणाने साजरी
आज सकाळी सोनगावच्या नूतन सरपंच शुभांगी देवकाते त्यांचे पती डॉ.विजय देवकाते, बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते मंदिरात विधिवत पूजा व महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. या ठिकाणी दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देवस्थान समिती ग्रामस्थ व प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने, एरवी गजबजणारा मंदिराचा परिसर आज सुनासुना दिसत होता.
मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आल्याने कोणीही दर्शनाला आले नाही. परिसरातील काही भाविकांनी नदीच्या अलिकडूनच दर्शन घेऊन समाधान मानले. यात्रा बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा - पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार?