ETV Bharat / state

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी केले सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची आहेत.

author img

By

Published : Jan 3, 2021, 1:39 PM IST

Savitribai Phule
सावित्रीबाई फुले

पुणे - आज सावित्रीबाई फुले यांची १९०वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फुले वाड्याला भेट दिली. त्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

धनंजय मुंडेंनी केले सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांचा जन्मदिवस राज्यात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. याबाबत मी देखील सभागृहात भूमीका घेतली होती. या शिक्षक दिनाची सुरुवात आज नायगाव या ठिकाणावरून झाली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री शिक्षक दिन साजरा करत आहेत, अशे मुंडे म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली फुले वाड्याचा विकास झाला. पुढच्या काळात या जागेचा आणखी विकास व्हावा, यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सावित्रीबाई फुले होत्या पहिल्या शिक्षिका -

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 या दिवशी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला होता. 1840 मध्ये वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा बारा वर्षांच्या जोतिबा फुले यांच्याशी विवाह झाला होता. जोतीबा सुशिक्षित आणि पुढारेल्या विचारांचे होते. लग्नानंतर त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला, वाचायला शिकवले. नंतर जोतीबा आणि सावित्रीबाईंनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी...

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी केली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला मान्यता दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.