पुणे- शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजघडीला १९ कोरोना बाधित रुग्ण आहेत. यात पुणे शहरात ८ तर पिंपरी चिंचवडमध्ये ११ रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत एका पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येणे टाळाले पाहिजे. मात्र, शहरात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात सोशल डिस्टंन्सिंग नियम अधिक काठोर केले जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही पुण्यापेक्षाही झपाट्याने वाढताना दिसते आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण हा पुणे शहरात आढळला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशातून भारतात परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाची संख्याही जास्त आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तरी देखील शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, सोशल डिस्टंसिंग नियम अधिक काटेकोर पणे पाळण्याची गरज असून येत्या काळात ते अधिक कठोर केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- जुनी वडारवाडी येथे भीषण आग; तीस पेक्षा अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी