ETV Bharat / state

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव; हजारो पणत्यांनी उजळला आसमंत

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या बरोबर लढणाऱ्या वीर मावळ्यांचे, सरदारांचे वंशज यांचा गौरवशाली इतिहास याचे जतन, संवर्धन आणि सत्य स्वरुपात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवून राष्ट्र समर्पित पिढ्या घडवणे आणि यासाठी अभिनव संकल्पनांना मूर्त स्वरुप देणे हे समितीचे कार्य कौतुकास्पद आहे.

author img

By

Published : Nov 7, 2021, 4:10 PM IST

Updated : Nov 7, 2021, 6:00 PM IST

Shri Chhatrapati Shivaji Maharaj Dipotsav 2021 celebration pune
पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव; हजारो पणत्यांनी उजळला आसमंत

पुणे - दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ, तुतारीची ललकारी, सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर आणि स्वराज्य घराण्यांच्या वंशजांनी केलेला शिवछत्रपतींचा जयघोष, अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्टसहस्र पणत्यांच्या लखलखाटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी दीपोत्सव साजरा झाला.

पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे याबाबत बोलताना

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव २०२१, पर्व १० यानिमित्ताने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित या दीपोत्सवाचे उद्घाटन पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, दिवंगत श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांसह शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते झाले.

विविध मान्यवरांचा करण्यात आला गौरव -

शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमुठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरनौबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, भोई स्वराज्यबांधव, राजे लखोजीराव जाधवराव या स्वराज्यघराण्यांचा अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात आला.तसेच यंदा सहभागी झालेल्या स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे या स्वराज्यघराण्यांचा दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना सुनावली 12 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी; देशमुखांचे वकील म्हणाले...

भविष्यात समितीचे कार्य केवळ देशाला दिशा देणारे ठरेल -

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या बरोबर लढणाऱ्या वीर मावळ्यांचे, सरदारांचे वंशज यांचा गौरवशाली इतिहास याचे जतन, संवर्धन आणि सत्य स्वरुपात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवून राष्ट्र समर्पित पिढ्या घडवणे आणि यासाठी अभिनव संकल्पनांना मूर्त स्वरुप देणे हे समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात समितीचे कार्य केवळ महाराष्ट्रालाच नव्हेतर देशाला दिशा देणारे ठरेल, असे विश्वास यावेळी डॉ.रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केला.

८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना -

अमित गायकवाड म्हणाले, शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षी शाहुछत्रपतीचे पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.

Last Updated : Nov 7, 2021, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.