पुणे - पुण्यातील कासेवाडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने वाहन आणि दुकानांची तोडफोड केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास घडला.
हेही वाचा- विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेवाडी येथील हरकानगर येथील एका झेरॉक्सच्या दुकानासमोर तरुणाने दुचाकी पार्क केली होती. यावेळी दुकानमालकाने दुचाकी लावण्यास मनाई केली. यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर संबंधित तरुणाने सात-आठ तरुणांच्या टोळीला बोलावून घेत वाहने आणि दुकानांची तोडफोड केली. एका तरुणाला मारहाणही करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास घडला. जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला. याप्रकरणी कासेवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.