ETV Bharat / state

टाळेबंदीमुळे हप्ते थकले अन् 'तिने' रिक्षातून सुरू केला व्यवसाय... - पुणे टाळेबंदी बातमी

टाळेबंदीच्या काळात अनेकांचे संसार उघड्यावर पडले. मात्र, पुण्यातील साळुंके दाम्पत्य खचून न जाता यूट्यूबवरुन ते मटकी भेळ शिकले. रिक्षातून ते भेळ विकत आहेत.

साळुंके दाम्पत्य
साळुंके दाम्पत्य
author img

By

Published : Sep 14, 2020, 4:59 PM IST

Updated : Sep 17, 2020, 12:42 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीचा फटका अनेकांना बसला आहे. काहींचे संसार उघड्यावर पडले तर काहींनी यातूनही काही मार्ग काढत आपला संसाराचा गाडा ओढत आहेत. शहरातील साळुंके दाम्पत्याने देखील खचून न जाता नवा व्यवसाय सुरू केला आहे.

टाळेबंदीमुळे हप्ते थकले अन् 'तिने' रिक्षातून सुरू केला व्यवसाय...

पुण्यातील डेक्कनच्या भिडे पुलाच्या नजीक राहणाऱ्या मनोज व आशा साळुंके यांचे कुटुंब राहते. मनोज यांनी उदरनिर्वाहासाठी एक रिक्षा घेतली होती. मात्र, टाळेबंदीमुळे त्या रिक्षाचे हप्ते भरणे मुश्किल झाले. मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही प्रमाणात उद्योग-धंदे, अटींसह वाहतूक सुरू झाली. मात्र, रिक्षामध्ये दोन प्रवासी बसवून कोरोनाशी दोन हात करत उदनिर्वाह करणे परवडणारे नव्हते. रिक्षाचा उद्योग संथ गतीने सुरू झाला. पण, रोजच्या गरजा व रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे यातून जड जात होते.

त्यांनी एकेदिवशी घरबसल्या काही उद्योग करता येईल का, या अनुषंगाने यूट्यूबवर शोध सुरू केला. त्यावेळी अनेक उद्योगांची माहिती त्यांना मिळाली. मात्र, त्यापैकी मटकी भेळ हा उद्योग परवडणारा होता. मग त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. घरातच रिक्षा असल्याने त्यांनी हातगाड्याऐवजी रिक्षातूनच भेळ विकण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी मटकी भेळ नेमकी कशी बनवतात याबाबत यूट्यूबरून माहिती मिळवली व बनवायला सुरू केले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर रिक्षा उभी करुन हे जोडपे रिक्षातून भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. कमी खर्चात सुरू झालेल्या या व्यवसायातून समाधानकारक नफा मिळत असल्याचे त्या जोडप्याचे म्हणणे आहे. ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत, असे आशा साळुंके यांचे म्हणणे आहे. या व्यवसायातून साळुंके दाम्पत्यांच्या मुलांच्या शैक्षणिक व घरातील दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत. सोबतच रिक्षाचे थकीत हप्तेही ते भरत आहेत.

हेही वाचा - 24 तासात वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने मलठण ग्रामस्थांनी मानले ऊर्जामंत्र्यांचे आभार

Last Updated : Sep 17, 2020, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.