ETV Bharat / state

शरद पवार.. वयाच्या 80 व्या वर्षीही राज्यासह देशाच्या केंद्रस्थानी असलेले अलौकिक नेतृत्व

author img

By

Published : Dec 12, 2020, 6:37 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील अविभाज्य घटक म्हणजे शरद पवार. एखाद्या राज्याच्या राजकारणावर सतत 60 दशके आपली छाप कायम ठेवणारा शरद पवार यांच्यासारखा नेता भारताच्या राजकारणात दुर्मीळच.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शनिवारी 12 डिसेंबरला वाढदिवस असून ते वयाची 80 वर्षे पूर्ण करत आहेत.

पुणे
पुणे

पुणे - देशातील महत्त्वाचे आणि प्रगत राज्य आलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वर्षापूर्वी राजकीय भूकंप घडून भल्या-भल्या राजकीय पंडितांनी विचारही केला नसेल, अशी आघाडी स्थापन होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे आले. देशाच्या पारंपरिक राजकारणाला अनोखे वळण देणारी आणि अक्षरशः चमत्कार वाटावी, अशी ही घटना आणि हा संपूर्ण राजकीय चमत्कार घडवून आणण्यात मुख्य भूमिका निभावत होते ते वयाच्या 80 व्या दशकात असलेले आणि जाणता राजा म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार.

पुणे

महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील अविभाज्य घटक म्हणजे शरद पवार. एखाद्या राज्याच्या राजकारणावर सतत 60 दशके आपली छाप कायम ठेवणारा शरद पवार यांच्यासारखा नेता भारताच्या राजकारणात दुर्मीळच.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शनिवारी 12 डिसेंबरला वाढदिवस असून ते वयाची 80 वर्षे पूर्ण करत आहेत. राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात पवारांचा सक्रिय वावर राहिला आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण होत असतानाही महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे शरद पवार यांच्या भोवतीच फिरत आहेत. हे गेल्या विधानसभा निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. बरोबर एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील वातावरण पूर्णपणे भाजपमय होते, शिवसेनेला सोबत घेऊन भाजप निवडणूक सहज जिंकणार, असे चित्र होते. विरोधी पक्ष आणि नेते हतबल दिसत होते.

नकारात्मक वातावरण असले तरी शस्र टाकायची नसतात

राज्याच्या राजकारणात कायम अग्रेसर असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले जात होते. पक्षातील जुने पवारांसोबत राहिलेले नेते एक-एक करून पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत होते, अशा नकारात्मक वातावरणातही शरद पवार नावाच्या राजकीय योध्याने जिद्द सोडलेली नव्हती. नव्या युवा नेतृत्वाला सोबत घेत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शत्रू प्रबळ असला तरी नकारात्मक वातावरण असले तरी शस्र टाकायची नसतात, गलीतगात्र व्हायचे नसते असे जणू सूचवत कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ त्यांनी दिले. साताऱ्यात पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाने कळस साधला गेला. ही सभा संस्मरणीय ठरली, निवडणुकीचे वातावरणच बदलले आणि पुढील इतिहास सर्वांना माहितीच आहे. असा हा लढवय्या नेता आजही आपली पकड महाराष्ट्राच्या राजकारणावर ठेवून आहे. पवार यांना राजकीय आणि सामाजिक जीवनाचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळाले.

देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री

राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे, राजकीय उत्तुंग शिखरे शरद पवारांनी या काळात पादाक्रांत केली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले ते त्यांनी 1978 साली काँग्रेसमध्ये केलेल्या बंडामुळे. जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. 1978 ते 1980, 1988 ते 1991 आणि 1993 ते 1995 याकाळात शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व केले. शरद पवारांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांच्या सार्वजनिक जीवनाच्या 60 दशकांचा विचार केला तर त्यांचा हा प्रवास पाच टप्प्यात विभागता येईल.

पुन्हा राजीव गांधींशी जुळवून घेत ते स्वगृही परतले

पहिल्या टप्प्याचा विचार केला तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले आणि काँग्रेस संस्कृती नावाची मूल्य व्यवस्था आपल्या व्यक्तिमत्त्वात रुजवली, खरे तर काँग्रेस व्यवस्था आणि काँग्रेस मूल्य व्यवस्था, असा फरक करण्याची क्षमता अत्यंत मोजक्याच म्हणजे पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, प्रणव मुखर्जी अशा नेत्यांमध्ये होती आणि या नेत्यांत शरद पवारांचा समावेश होतो. काँग्रेस पक्षात जेव्हा मूल्य व्यवस्थेचा ऱ्हास होतो आहे, असे वाटले तेव्हा त्यांनी बाहेर पडत 'पुलोद'चा प्रयोग केला. मात्र, तो फार काळ टिकला नाही, हा त्यांच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा होता. 1986 ला पुन्हा राजीव गांधींशी जुळवून घेत ते स्वगृही परतले हा त्यांच्या कारकिर्दीचा तिसरा टप्पा म्हणता येईल. शरद पवारांच्या कारकिर्दीचा चौथा टप्पा विचारात घेतला तर आगामी काळात आघाड्यांचे राजकारण महत्त्वाचे ठरणार हे पवारांनी ओळखले आणि त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा चौथा टप्पा म्हणता येईल आणि महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडी हा राजकीय चमत्कार म्हणजे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा पाचवा टप्पा म्हणता येईल. आता राज्यातील हा प्रयोग देश पातळीवर करण्याच्या दृष्टीने सुरू आहे. हा त्यांच्या पाचव्या टप्प्यातील कारकिर्दीचा उच्च बिंदू ठरेल. एकंदरीतच शरद पवारांच्या सार्वजनिक जीवनातील या पाच टप्प्यांचा विचार केला तर प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वेगळे समीकरण, प्रयोग केले आणि ते त्यांनी यशस्वीही केले. त्यामुळे देशपातळीवर त्यांच्या नेतृत्वाबाबत कायम आकर्षण राहिले आहे आणि आता पुन्हा एकदा वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना शरद पवार देश पातळीवर काय समीकरण जुळवता याकडे देशाचे लक्ष आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.