पुणे Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर अनेक आमदार हे सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर त्या आमदारांपुढे आव्हान उभं करण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्रभर विविध सभा घेत आहे. ते मोठी ताकद निर्माण करत असल्याचं सध्या चित्र आहे. त्यातच आता माजी आमदार खासदारांची एक महत्त्वाची बैठक मुंबईत शरद पवार यांनी बोलावलेली आहे. नऊ तारखेला ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळं शरद पवार आणखी आक्रमक होतात, हे पाहणं महत्वाचं आहे. तसंच कोणते आमदार नेमकं शरद पवारांसोबत आहेत, कोणते खासदार त्यांच्यासोबत आहे, हे आता या बैठकीतून स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत. (Sharad Pawar meeting)
मुंबईत होणार महत्वाची बैठक : शरद पवारांनी मुंबईत 9 सप्टेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावलीय. या बैठकीला शरद पवारांना साथ देणारे सगळे विद्यमान आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील माजी आमदार, माजी खासदार, जिल्ह्या़चे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना निमंत्रण देण्यात आलंय. (Sharad Pawar news) त्यामुळं आता बऱ्याच आमदार खासदारांनी अजित पवारांना साथ दिलेली आहे, असं असताना पक्षाचे माजी आमदार खासदार पदाधिकारी नक्की कोणासोबत आहेत, हे या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी : शरद पवार स्वतः राज्यभरातील माजी आमदारांचा आढावा घेणार आहेत. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध करण्यासाठी शरद पवारांनी ही महत्वाची बैठक बोलावलीय. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी देखील या बैठकीतून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे देखील या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच शरद पवार स्वतः राज्यातील विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे, त्यामुळं या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागलंय. (ncp MLAs and MPs meeting)
हेही वाचा :
- Maratha Reservation Protest : सत्तेवर असताना मराठ्यांना शरद पवार का न्याय देऊ शकले नाहीत?
- Sharad Pawar in Jalgaon: राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंतप्रधान मोदींनी चौकशी करावी, पण...शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- Sharad Pawar On Maratha Reservation : आंदोलकांवर बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, पवारांचं सरकारवर टीकास्त्र