पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा महिन्यांपासून गैरहजर असलेल्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून या पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून ही कर्तव्यावर रुजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. ही माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
झोन १ आणि झोन दोन मधील एकूण ७ पोलीस कर्मचारी आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.सध्या देशभर करोना ने थैमान घातले असून रस्त्यावर केवळ पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे काही पोलीस कर्मचारी याचा गैरफायदा घेत असताना दिसत असून ते गेल्या सहा महिन्यापासून गैरहजर आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तीन हजार पोलीस कर्मचारी असून यातील अनेक जण अधिकृत सुट्टी, मेडिकल रजेवर आहेत. मात्र, अवघ्या देशात पोलीस कर्मचारी करोनाशी दोन हात करत असताना सात पोलीस कर्मचारी सहा महिन्यांपासून गैरहजर आहेत. त्यांना करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून वारंवार हजर राहण्यास सांगितले मात्र त्यांनी विविध कारणे देत त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे आज पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी थेट त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. झोन एक आणि दोन मधील एकून 7 पलीस कर्मचारी निलंबीत करम्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.