ETV Bharat / state

Pune News: मोठ्या आवाजाने वैतागून ज्येष्ठ नागरिकाने फोडला दहा लाखाचा डीजे; पोलिसांत तक्रार दाखल

author img

By

Published : Mar 10, 2023, 1:22 PM IST

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाने मोठ्या आवाजाने वैतागून फोडला डीजे फोडला. या डीजेची किंमत सुमारे दहा लाख होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Pune News
ज्येष्ठ नागरिकांनी फोडला दहा लाखाचा डीजे

पुणे : कुठलाही सण उत्सव असला की, पूर्वी बँड बाजा वाजायचे. त्याचा आवाज ही कानाला झेपेल एवढा असायचा. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला आणि बाजारामध्ये डीजे आला. एडिटर डीजेमध्ये तरुणाई नाचून गाऊन आपला आनंद सादर करत असली, तरी याचा अनेक लोकांना त्रास होतो. शासनाकडून त्यासाठी डेसिबलची मर्यादासुद्धा दिली जाते. परंतु कित्येक वेळा डीजे हे मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण करून नागरिकांना त्रास देत असतात.

दहा लाख रुपयाचे नुकसान : असाच प्रकार पुण्यात घडला आहे. एका लग्न समारंभात जाऊन एका ज्येष्ठ नागरिकाने डीजेच्या आवाजाला कंटाळून डीजेचे वायर, मशीन्स, स्पीकर, तोडून टाकत तब्बल दहा लाख रुपयाचे नुकसान केले आहे. पुण्यातील कोंढवा खुर्दमध्ये बुधवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक सत्यबिर बंगा यांच्या विरोधात अब्दुल रीसालदार याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ८ ममार्च रोजी कोंढवा भागात असणाऱ्या, कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी एक विवाह सोहळा संपन्न होत होता.

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : विवाह असल्यामुळे या ठिकाणी डीजे सिस्टम लावण्यात आली होती. या रिसॉर्टपासून सत्यबिर बंगा यांचे घर काही अंतरावर आहे. दरम्यान या लग्न समारंभात सुरू असलेल्या डीजे सॉंग सिस्टिमच्या आवाजाचा त्रास होत असल्याने, बंगा यांनी थेट रिसॉर्ट मध्ये विनापरवानगी प्रवेश केला. ज्या ठिकाणी लग्न सुरू होते, त्या ठिकाणी जाऊन त्याने सुरू असलेल्या साऊंड सिस्टमच्या बाहेर वायर तोडून टाकल्या, रागाच्या भरात त्याने एलईडी ऑपरेटरचा, लॅपटॉप देखील फोडला. इतर सगळ्या वस्तूंचे नुकसान केले. या सगळ्या साऊंड सिस्टमची किंमत जवळपास दहा लाख रुपये होती. मिळालेल्या माहितीनुसार बंगा यांचे घर या रिसॉर्टपासून काही अंतरावर आहे. याआधी देखील त्यांनी अशा अनेक कार्यक्रमात जाऊन गोंधळ घातले आहेत. बंगा यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम 427, 452 आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Swara Bhaskers wedding :लग्न उत्सवासाठी सजले स्वरा भास्करचे घर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.