पुणे - देशाच्या सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा आज रक्षाबंधन सण आंबेगाव तालुक्यातील लोणी गावात भैरवनाथ विद्यालयात पार पडला. लोणी गावातून सैन्याची बटालियन जात असताना गावातील मुलांनी या जवानांचे स्वागत करत आमचे रक्षण करण्याचे वचन घेऊन भारतमातेच्या रक्षणाची थपथ घेत शाळकरी मुलींनी जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यातील बंधनाचा सण म्हणून साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाकडून रक्षणाचे वचन घेऊन बंधनाचा धागा बांधते. यातून बहीण-भावाचे नाते अजूनच भक्कम करत असते. मात्र, आपलाच भाऊ देशाच्या सीमेवर आपल्या भारतमातेचे रक्षण करत असतो त्यावेळेस त्यांना देशभरातून राख्या पाठवल्या जात असतात. रक्षाबंधनाच्या तोंडावर सैनिकांची बटालिय लोणी गावातून जात असताना या गावातील मुलींना या सैनिकांना राखी बांधण्याचा सोहळा आयोजित केला.
आज लोणी गावात झालेल्या स्वागत आणि बहिणींच्या रुपात येऊन मुलींनी ओवाळणी करुन रक्षाबंधन साजरे केले. तसेच अजून ताकद मिळाल्याचे सांगत भारत मातेच्या रक्षणाची या जवानांनी शपथ दिली.
मुलगी वाचवा देश वाचेल, अशी हाक देशभरात दिली जाते. यातून आम्हा मुलींचे देशातील प्रत्येकाने संरक्षण करावे म्हणून शाळकरी मुलींकडून विविध संदेश देत गावागावात आगळावेगळा रक्षाबंधन सण साजरा केला गेला. त्यामुळे याठिकाणी जवानच भावूक झालेले पहायला मिळाले.