पुणे : सध्या गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणा आणि त्यापासून होणाऱ्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लठ्ठपणाने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होतात. आता तर कमी वयाच्या लोकांना देखील हे आजार होऊ लागले आहे. यासाठी मग सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक तसेच वजन करण्यासाठी विविध उपाय योजना कराव्या लागतात. त्यातही जर लठ्ठपणा कमी झाला नाही तर मग बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करावी लागते. तीही खूप महागडी असते. पण आता ही बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया ही पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत होणार आहे. अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी दिली.
शस्त्रक्रिया होणार मोफत : बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा हा केवळ श्रीमताचा आजार राहिलेला नाही. सर्वच स्तरामध्ये लठ्ठपणा दिसून येत आहे. लठ्ठपणा अनेक रोगांना निमंत्रण देतो. ज्या व्यक्तींना वैद्यकीय समस्या असतात, त्यांना लठ्ठपणा असल्यास संबंधित रोगाची तीव्रताही वाढते. काही रुग्णांना लठ्ठपणामुळे रात्री झोपेत श्वास अथवा माकड हाडावर दाब येतो. त्यामुळे हिप रिप्लेसमेंट, नी रीप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. लठ्ठपणा आल्याने बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करावीच लागते. त्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये मोठा खर्च हा सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो. पण आता ओबीसीटी मुक्त राज्य या महिमे अंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
का केली जाते बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया : बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया ही अश्या प्रकारची शस्त्रक्रिया आहे, जी प्रामुख्याने ज्या व्यक्तींना लठ्ठपणा आला आहे. त्यांच्याकडून इतर उपाय योजना करूनही ते कमी होत नाही. त्यांना या लठ्ठपणामुळे इतरही त्रास होत आहे. म्हणून प्रामुख्याने बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया ही केली जाते. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया खूपच सुरक्षित आहे. शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना एंडोक्राइनोलॉजिस्ट/डायबेटोलॉजिस्ट आणि ऑपरेटिंग टीमच्या नियमित फॉलोअपखाली असणे आवश्यक आहे. वेळोवेळी औषधे तसेच पूरक आहार घेणे आवश्यक असते.
12 रुग्णांची केली बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया : याबाबत डॉ संजीव ठाकूर म्हणाले की, जेव्हा जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतली तेव्हा पासून ते आतापर्यंत त्यांनी जवळपास 12 रुग्णांची बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया ही मोफत केली आहे. यात 4 महिलांवर आणि आठ पुरुषांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अगदी 36 वर्षांच्या महिलेपासून ते 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. या सर्वांना लठ्ठपणासह काही ना काही आजार होता. पण त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर पूर्वी त्यांना जो त्रास होत होता तो आता होत नाही.
हेही वाचा -