ETV Bharat / state

Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर

Sasoon Drugs Case : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हिसका मारुन पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पण सीसीटीव्हीमध्ये तो चालत जात असल्याचं दिसून येतंय. यामुळं पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Sasoon Drugs Case
Sasoon Drugs Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 11:10 AM IST

पुणे Sasoon Drugs Case : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलनं सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पलायन केले. विशेष म्हणजे गार्ड ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत त्यानं पळ काढलाय. आता या घटनेचं आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून या सीसीटीव्हीमधून धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळत नाही, तर आरामात चालत निघून जातानाचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. त्यामुळं या प्रकरणात आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

ललित पाटील पळाला की पळवला : ललित पाटील हा ससून रुग्णालयाच्या गेट जवळून पळून नाही, तर रुग्णालयाच्या आवारातून आणि मुख्य रस्त्यावरुन शांतपणे चालत जाताना दिसतोय. त्यामुळं तो पोलिसांना हिसका देऊन पळून गेला, या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचबरोबर ससून रुग्णालयातून पळून जाण्यात अधिकाऱ्यांची त्याला मदत झालीय का? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काळी टोपी आणि मास्क घालून तो सगळ्या परिसराची पाहणी करत जाताना दिसत आहे. त्यामुळं तो पळाला की त्याला पळवला, याचा तपास आता वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

पोलिसांचं निलंबन : या प्रकरणानंतर पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळं पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत एकाच दिवशी थेट नऊ पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. मात्र सीसीटीव्हीत ललित पाटील आरामात जात असल्याचं दिसत असल्यानं या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे. तसंच ललित पाटीलला पकडण्यासाठी अनेक पथकं रवाना करण्यात आली आहेत.

एक्स रे काढण्यासाठी नेताना पलायन : दोन दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालय इथून पुणे पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचं अमली पदार्थ पकडलं होतं. या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्यानं सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पलायन केल्याचं समोर आलंय. रात्री त्याला छातीचा एक्स रे काढण्यासाठी वार्ड क्रमांक १६ मधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळी ड्युटीवरील पोलीस गार्डच्या हाताला हिसका मारुन तो फरार झाला आहे. आता या घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलंय.

हेही वाचा :

  1. Pune Crime News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांचा तपास सुरू
  2. Lonavala Gang Rape : पर्यटनाला आलेल्या मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार; दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
  3. Pune Crime News: ...'या' साठी आई-वडिलांनी मुलीला दोन हजाराला विकले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.