ETV Bharat / state

Uday Samant on Sanjay Raut : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमुळे जातीय तेढ निर्माण, मंत्री उदय सामंत यांची टीका - साई बाबावर टीका

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमुळे जातीय तेढ निर्माण होतो. संजय राऊत यांना काही काम नाही त्यामुळे मी त्यांना महत्व देत नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Uday Samant Criticism Sanjay Raut
Uday Samant Criticism Sanjay Raut
author img

By

Published : Apr 2, 2023, 8:18 PM IST

Updated : Apr 2, 2023, 8:37 PM IST

मंत्री उदय सामंत यांची राऊतांवर टीका

पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांच्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांना जी खासदारकी मिळाली आहे ती 41आमदारांनी मतदान केले आहे, तेव्हाच खासदारकी मिळाली आहे. सामंत आज पुण्यात बोलत होते.

संजय राऊतांकडे काही काम नाही : मी जर, त्यांच्या जागी असतो तर पहिले खासदारकीचा राजीनामा दिला असता. मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असती. त्यांची दखल आपणच घेता बाकी राज्यातील जनता त्यांची दखल घेत नाही. मी त्यांच्यावर आठ, पंधरा दिवसांनी बोलत असतो. कारण माझ्याकडे खूप काम असते, त्यांच्याकडे काम काहीही नाही. सकाळी साडे नऊला तारक मेहता का उलटा चष्मासारखे तेच असतात, अशी टीका यावेळी सामंत यांनी केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आस्थीचे देखील दर्शन घेतले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका - ते पुढे म्हणाले की, हल्ली आम्हाला संजय राऊत यांच्याचं प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात. संभाजीनगरमध्ये जे झाले त्यानंतर सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. पण जी साडे नऊची पत्रकार परिषद होत असते ती जातीय तेढ निर्माण करणारी असते. त्यांना जास्त महत्त्व देत नसल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले. आज महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, एक महिन्यापूर्वी रत्नागिरीत सभा झाली. गर्दी झाली आहे हे दाखविण्यात आले. यानंतर आमची सभा झाली. त्यात दहा पट लोक आली.आत्ता जी सभा होत आहे.ती तीन ते चार पक्ष एकत्र मिळून घेत आहे.

पुढच्या वेळेला शिंदे फडणवीस यांचच सरकार : आपल्या कडील कार्यकर्ते तसेच आमदार इकडे तिकडे जाऊ नये म्हणून एवढी गर्दी आमच्या सोबत असल्याचे दाखवण्याचे हा प्रयत्न आहे. भाजप शिवसेनेने जर सभा घेतली तर, लाखो लोक हे एकत्र येतील पण आम्ही घेणार नाही. यातून स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबतीत काय मत आहे हे जाहीर करावं. गर्दी जरी झाली तरी पुढच्या वेळेला शिंदे फडणवीस यांचच सरकार येणार असल्याचे यावेळी सामंत म्हणाले.

साई बाबावर टीका करणे चुकीचे : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी तर बागेश्वर बाबा यांनी साईबाबा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केला आहे. यावर सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की साई बाबा, महात्मा गांधी यांच्यावर टीका करणे योग्य नाही. वेळ पडल्यास पुरावे हातास आल्यावर गुन्हा देखील दाखल करू. तसेच साई बाबा, छत्रपती शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या बाबतीत टीका करने योग्य नाही अस यावेळी सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की गिरीश बापट हे पक्षाच्या बाहेर जाऊन संबंध ठेवणारे होते. मी ज्या ज्या कार्यक्रमाला निमंत्रण दिले, त्या त्या कार्यक्रमाला ते आले होते. विरोधात असलो तरी ते नेहेमी माझ्या कार्यक्रमाला यायचे. एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार नेता हरपला आहे. याच दुःख हे मला नेहेमीच असणार असल्याचं यावेळी सामंत यांनी सांगितल.

हेही वाचा - Sambhajinagar Riots Case : छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरण; आतापर्यंत 28 जण अटकेत, तर 50 जणांची ओळख पटली

Last Updated : Apr 2, 2023, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.