ETV Bharat / state

Kasaba By Poll Election : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच जिंकणार, रणनीती ठरली - संजय काकडे - sanjay kakde on kasaba by poll election

कसबा पोट निवडणुकीत जर 40 ते 45 टक्के मतदान झाले तर आम्ही ही निवडणूक 25 ते 28 हजार मतांनी जिंकू. जर मतदान 35 टक्के झाले तर 22 हजार मतांनी निवडणूक जिंकू. 50 टक्के मतदान किंवा त्यापुढे मतदान झाले तर आम्ही 35 हजार मतांनी ही निवडणूक जिंकू असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Kakade
संजय काकडे
author img

By

Published : Feb 16, 2023, 2:25 PM IST

25 ते 28 हजार मतांनी जिंकणार

पुणे : कोणतीही निवडणूक असेल तर राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी कसबा पोट निवडणुकीवर आपली भविष्यवाणी केली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे नाराज होते. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीत शहरातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी काकडे यांची समजूत देखील काढण्यात आली आहे. असे सांगितल जात आहे. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाल्यामुळे संजय काकडे यांची नाराजी दूर झाल्याची चिन्ह आहेत. ते आजपासून प्रचारसभांमध्ये सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे.

पोटनिवडणुकीची रणनीती : काल झालेल्या बैठकीबाबत संजय काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की कालच्या बैठकीत कोणाचीही कान उघडणी करण्यात आलेली नाही. कसबा पोटनिवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काल बैठक घेण्यात आली होती. तिन्ही पक्षांची आघाडी झाल्याने कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती ठरवायची यासाठी काल बैठक घेण्यात आली होती. मी नाराज नसून माझी बिझनेसची काही कामे सुरू होती. त्यामुळे मी व्यस्त होतो. पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 26 तारखेपर्यंत तुमचे व्यवसाय बाजूला ठेवा. त्यामुळे येता सव्वीस तारखेपर्यंत मी कसबा पोट निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार आहे. असे यावेळी काकडे म्हणाले.

लोकसभेची रिस्क नको : येणाऱ्या महानगरपालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कुठल्याही पद्धतीचे रिस्क नको. म्हणून आम्ही लक्ष घातले आहे. आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकू. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य शासनाने राबवलेल्या योजना कसबा मतदार संघातील नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, असे देखील यावेळी काकडे म्हणाले. खासदार गिरीश बापट यांच्या बाबतीत प्रश्न विचारला असता काकडे म्हणाले की खासदार गिरीश बापट यांची तब्येत बरी नाही. त्यांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. अश्या पद्धतीने जर ते प्रचाराला आले तर तुम्हीच नाव ठेवणार तसेच पक्षाची देखील इज्जत जाणार. अशा परिस्थितीमध्ये मी प्रचाराला आलो आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरचे सर्वजण प्रचारात सहभागी होणार असल्याचे देखील काकडे यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू ,युक्तीवादाला झाली सुरूवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.