ETV Bharat / state

सांगवी पोलिसांकडून २ सराईत गुन्हेगार जेरबंद; एकावर 10 तर, दुसऱ्यावर 20 गुन्हे दाखल - two arrested

कोयत्याचा धाक दाखवून सोन्याच्या दोन अंगठ्या व मोबाईल असा 1 लाख रुपयांचा ऐवज सराईत गुन्हेगाराने काही दिवसापूर्वी चोरला होता. त्या चोरांचा शोध पुण्यातील सांगवी पोलिसांनी घेतला आहे. यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

सांगवी पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Jul 21, 2019, 4:45 PM IST

पुणे - दुचाकी थांबवून रस्त्याच्याकडेला पाणी पित असणाऱ्या व्यक्तीला दोन अज्ञात सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याची घटना घडली होती. सोन्याच्या दोन अंगठ्या आणि मोबाईल असा ऐवज त्यांनी लुटला होता. त्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सांगवी पोलिसांनी केले दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

शहारुख रहीम शेख (वय २४) आणि विशाल नानासाहेब आव्हाड (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. विशालवर १० तर, शहारुखवर २० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सराईत आरोपी हे रहाटणी येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास लग्न सोहळा आटोपून ते पुण्याच्या दिशेने जात होते. तेव्हा संबंधित तक्रारदार हे दुचाकी रस्त्याच्याकडेला लावून पाणी पीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या विशाल आणि शहारुखने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून बोटातील अंगठी आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यांनी तातडीने येऊन सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सांगवी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. लुटलेला मोबाईल हा बदलापूर मुंबई येथे ऍक्टिव्हेट असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तातडीने मुंबई येथे जावून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता तो मोबाईल मावसभाऊ शहारुखने त्यांना भेट दिल्याचे सांगितले. त्याला हडपसर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच साथीदार विशालसह तक्रारदाराला लुटल्याची कबुली त्याने दिली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंखे पोलीस कर्मचारी कैलास केंगले, सुरेश भोजने, भिसे, दांडगे, रोहिदास बोऱ्हाडे, देवकांत नराळे, अनिल देवकर आदींनी केली आहे.

Intro:mh_pun_01_wanted_arrest_avb_10002Body:mh_pun_01_wanted_arrest_avb_10002

Anchor:- दुचाकी थांबवून रस्त्याच्याकडेला पाणी पीत असणाऱ्या व्यक्तीला दोन अज्ञात सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याची घटना घडली होती. सोन्याच्या दोन अंगठ्या आणि मोबाईल असा ऐवज त्यांनी लुटला होता. त्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. शहारुख रहीम शेख वय-२४ आणि विशाल नानासाहेब आव्हाड वय-१९ अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून विशालवर १० तर शहारुखवर २० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सराईत आरोपी हे रहाटणी येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला आले होत. रात्री साडेआठच्या सुमारास लग्न सोहळा आटोपून ते पुण्याच्या दिशेने जात होते, तेव्हा संबंधित फिर्यादी हे दुचाकी रस्त्याच्याकडे ला लावून पाणी पीत होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या विशाल आणि शहारुख ने कोयत्याचा धाक दाखवून बोटातील अंगठी आणि मोबाईल दमदाटी करून घेतला होता. त्यांनी तातडीने येऊन सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी तांत्रिक तपास करून लुटलेला मोबाईल हा बदलापूर मुंबई येथे ऍक्टिव्हेट असल्याचं समजले. तातडीने मुंबई येथे सजवून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारणा केली असता तो मोबाईल मावसभाऊ शहारुख याने भेट दिल्याचे सांगितले. त्याला हडपसर येथून ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच साथीदार विशालसह फिर्यादि यांना लुटल्याचे कबुली दिली. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे,गुन्हे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंखे पोलीस कर्मचारी कैलास केंगले, सुरेश भोजने, भिसे, दांडगे, रोहिदास बोऱ्हाडे, असवले, देवकांत, नराळे, देवकर,पिसे,खोपकर,गुत्तीकोंडा, अनिल देवकर आदींनी केली आहे.

बाईट:- प्रभाकर शिंदे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.