पुणे - सातारा रस्त्यावरील 'खेड - शिवापूर' 'टोल' नाका तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही टोल हटल्याशिवाय हटणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे..खेड शिवापूरसह पुणे जिल्ह्यातील सर्व टोल बंद करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेड' च्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी ब्रिगेडकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करण्यात आले आहे..
खेड - शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हा, पुरंदर तसेच इतर भागातून दररोज हजारो प्रवासी आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. टोलनाका प्रशासन या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही. सध्या 'टोलधाड' सुरू असल्याचा आरोप ब्रिगेडने केलाय.