ETV Bharat / state

CCTV : जुन्नर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू - manager killed in firing

जुन्नरमधील अनंत ग्रामीण पतसंस्थेत (Robbery at Anant Gramin Patsanstha) आज दुपारी 2 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला (Junnar Robbery) आहे. यात दोन लाख 50 हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे.

Junnar Robbery
अनंत ग्रामीण पतसंस्थेवर दरोडा
author img

By

Published : Nov 24, 2021, 4:17 PM IST

Updated : Nov 24, 2021, 7:19 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील १४ नंबर फाट्यावर असलेल्या अनंत ग्रामीण पतसंस्थेत (Robbery at Anant Gramin Patsanstha) आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 2 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला (Junnar Robbery) आहे. यात दोन लाख 50 हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

दरोडा टाकतानाचा सीसीटीव्ही

यावेळी बँकेत बँक व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते. या दरोड्यात बंदुकीची गोळी लागून व्यवस्थापकाचा मृत्यू झाला आहे. नारायणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

  • गोळी झाडल्याने व्यवस्थापकाचा मृत्यू -

या दरम्यान दोन दरोडेखोर हातात बंदूक घेऊन धमकावत होते. यावेळी व्यवस्थापक दशरथ भोर यांनी विरोध केला असता त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. यामध्ये दशरथ भोर यांचा मृत्यू झाला आहे. नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Nov 24, 2021, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.