ETV Bharat / state

शिरुर लोकसभा : आढळराव-पाटील 'चौकार' मारणार, की अमोल कोल्हे क्लीन बोल्ड करत दिल्ली गाठणार? - SHIVAJI AADHALRAO PATIL

शिरूर लोकसभा मतदारसंघाची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ
author img

By

Published : Apr 20, 2019, 12:56 PM IST

Updated : Apr 21, 2019, 7:33 PM IST

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघाची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे. या मतदारसंघात आढळराव पाटलांनी थेट पवारांना आव्हान दिले होते. तर राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना तिकीट देऊन आढळराव पाटलांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ, वारकऱ्यांची पंढरी असलेली आळंदी, अष्टविनायकांपैकी ओझर, लेण्याद्री, रांजणगाव, थेऊर या ठिकाणांचा इतिहासाचा वारसा लाभलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर गेल्या १५ वर्षांपासून शिवाजी आढळराव पाटलांनी आपली पकड कायम ठेवली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ

शिरूर लोकसभा मतदारसंघावर मागील १० वर्षांपूर्वी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड भक्कम असतानाही शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी हे मताधिक्य कमी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन आढळरावांच्या 'चौकाराला' क्लीनबोल्ड करण्यासाठी भक्कम फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. दत्तात्रयाची तीन मुले दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील आणि वल्लभ बेनके या तिघांनीही आढळरावांना चितपट करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, या मतदारसंघात दोघांनाही ही निवडणूक सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

२०१४ ची परिस्थिती

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना):- 6 लाख 43 हजार 415
देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) :- 3 लाख 41 हजार 601

पक्षीय बलाबल

शिरूर लोकसभा मदरसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ ठिकाणी भाजपचे, २ जागेवर शिवसेनेचे तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे

शिरूर - बाबुराव पाचर्णे (भाजप)
हडपसर - योगेश टिळेकर (भाजप)
भोसरी -–महेश लांडगे (अपक्ष आमदार भाजप संलग्न)
खेड-आळंदी - सुरेश गोरे (शिवसेना)
जुन्नर - शरद सोनवणे (मनसेतुन शिवसेनेत प्रवेश)
आंबेगाव -–दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जनमानसामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रत्येक घराघरात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोल्हे व आढळराव पाटील या दोघांचीही लोकप्रियता तुल्यबळ असल्याचे चित्र दिसत आहे.

मतदारसंघातील प्रश्न

या मतदारसंघात महामार्गांवरील वाहतूक कोंडी, विमानतळ, पुणे नाशिक रेल्वे व इतर नागरी सुविधा यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचे चित्र आहे. मात्र, यातील एकही प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागला नाही. त्यामुळे आता आढळराव पाटील चौकार मारणार की अमोल कोल्हे त्यांनी क्लिन बोल्ड करत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MH__19-APRIL__RAJGURUNAGAR-PUNE_Rohidas Gadge__shirur Loksabha.

Slug__शिरुर लोकसभा_शिरुर लोकसभा मतदार संघातील रंगत बनली प्रतिष्ठेची..

____________________________________
Feed FTP__SHIRUR LOKSABHA.

Total file__14

Byte__05
_____________________________________

Anc__ शिरूर लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जातो याचं कारणही तसंच आहे गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदारसंघावर शिवाजी आढळराव पाटील यांचं वर्चस्व असून आढळराव पाटलांनी या मतदारसंघात थेट पवारांना आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर सुरू झाला तो राजकीय लढाईचा संघर्ष..! आणि या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात उमेदवारी देऊन एक तगडं आव्हान समोर उभं केलंय...!

Vo__बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ, वारकऱ्यांची पंढरी असलेलं आळंदी, अष्टविनायकांपैकी ओझर, लेण्याद्री,रांजणगाव, थेऊर या ठिकाणांचा इतिहासाचा वारसा लाभलेला हा मतदारसंघ यासह मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवाजी आढळराव पाटलांनी आपली पकड कायम ठेवलय...

Vo__शिरूर लोकसभा मतदार संघावर मागील दहा वर्षांपूर्वी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड भक्कम असतानाही शिवसेनेच्या शिवाजी आढळराव यांना मोठे मताधिक्य मिळाले मात्र यावेळी हे मताधिक्य कमी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन आढळरावांच्या "चौकाराला" क्लीनबोल्ड करण्यासाठी भक्कम फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे दत्तात्रयाची तीन मुले दिलीप मोहिते,दिलीप वळसे, वल्लभ बेनके या तिघांनीही आढळराव यांना क्लीन करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढले आहेत मात्र या मतदारसंघात दोघांनाही ही निवडणूक सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात

Byte __कोंडीभाऊ पाचारणे__राजकिय विश्लेषण पत्रकार.

Vo__शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जनमानसामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तर दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रत्येक घराघरात स्थान निर्माण केला आहे त्यामुळे या मतदारसंघात कोल्हे व आढळराव पाटील या दोघांचीही लोकप्रियता तुल्यबळ असल्याचे चित्र दिसत आहे मात्र छत्रपतींच्या नावे राजकारण करुन मतं मिळत नसल्याचा टोलाही आढळरावांनी लागवलाय...!

Byte__शिवाजी आढळरावपाटील..

Vo__आढळरावांनी टिका केली तर कोल्हे त्याला उत्तर तर देणारच

Byte__डॉ अमोल कोल्हे

Vo__शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना या मतदारसंघातील प्रमुख त्याच्या समस्या पाहता महामार्गांवरील वाहतूक कोंडी,विमानतळ,पुणे नाशिक रेल्वे व इतर नागरी सुविधा यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्याचे चित्र आहे मात्र यातील एकही प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागला नसल्याने येणाऱ्या 29 तारखेला मतदार राजा कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल

END PTC__रोहिदास गाडगे__प्रतिनिधी

२०१४ निवडणुकीचा निकाल....!

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता. 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी...!
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना):- 643415

देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) :- 341601

शिरूर लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या – 6

जुन्नर– शरद सोनवणे (मनसेतुन शिवसेनेत प्रवेश)

आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

खेड-आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)

शिरूर – बाबुराव पाचर्णे (भाजप)

भोसरी – महेश लांडगे (अपक्ष आमदार संलग्न भाजप )

हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)
Last Updated : Apr 21, 2019, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.