पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला ( Upload nude photos on porn site ) आहे. प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून मैत्रिणीचे खासगी क्षणातील फोटो, अश्लिल व्हिडीओ बनावट खाते तयार करून पॉर्न साईडवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Refuse love affair took revenge ) आहे. ही घटना मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एसीपीच्या मुलाने ( ACP son Act ) हे कृत्य केले आहे.
सायबर पोलिसांत तक्रार दाखल : या प्रकरणात पोलिसांनी अमेय अनिल दबडे (रा. टिळेकर नगर कोंढवा बुद्रुक) याच्या विरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. संबंधित मुलगी आणि आरोपी अमेय दबडे हे कोकणात असताना एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर पुढील शिक्षणसाठी ते पुणे येथे आले. मात्र पुण्यात आल्यानंतर संबंधित तरुणीने त्या तरुना सोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सरळ नकार दिला. दोघे एकत्र असल्याने अमेय याला तरुणीच्या सोशल मीडियावरून अकाऊंटचे आयडी आणि पास वर्ड माहीत होते. त्याचाच फायदा घेत आरोपी अमेय याने. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही न्यूड फोटो शेअर केले. तिच्या नावाने फेक अकाउंट तयार करून तिचा नंबर त्या अकाऊंटवर शेअर केला. त्यामुळे अनेक अश्लील संभाषणाचे फोन संबंधित मुलीला येऊ लागले. तिने स्वतचे अकाऊंट चेक केल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.
लोणी काळभोर पोलिसांकडे तपास : सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडे सोपवला ( Loni Kalbhor Police Station ) आहे. प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. आरोपीचे वडील हे पोलीस खात्यातून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले आहेत.