दौंड(पुणे) - 'ईटीव्ही भारत'ने पाटस - बारामती मार्ग रोटी घाटात काही ठिकाणी उखडला या मथळ्याखाली रविवारी बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या आणि २४ तासांच्या आत रोटी घाटातील उखडलेल्या जागी जेसीबी मशीनच्या साह्याने उकरून पुन्हा रोड सुधारणा करण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांनी सदर वृत्त प्रकाशित केल्याबद्दल 'ईटीव्ही भारत'चे आभार व्यक्त केले आहेत.
- ई टीव्ही भारतच्या बातमीची दखल -
दौंड आणि बारामती या दोन तालुक्यांना जोडणारा मार्ग म्हणजे पाटस - बारामती मार्ग. पाटस-बारामती या मार्गाचे सध्या सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता रोटी घाटात उखडला असल्याचे दिसत आहे. या मार्गाचे काम व्यवस्थितरित्या करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते.
- रोटी घाटातील रस्त्याचे काम सुरू -
या मार्गाच्या सुधारणा करण्याच्या कामासाठी जवळपास दहा कोटी एवढा भरीव निधी मंजूर केला. कामही सुरू झाले, मात्र रोटी घाटात अनेक ठिकाणी केलेले काम उखडले असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिक आणि प्रवाशी नाराजी व्यक्त करत होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रोटी घाटात रस्ता उखडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. तसेच खड्डे वाढत असून अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतची चिंता नागरिकांनी ईटीव्ही भारतकडे बोलताना व्यक्त केली होती.
- येत्या दोन दिवसात काम पूर्ण होईल -
सदर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तत्काळ पाटस - बारामती मार्गावरील रोटी घाटात उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले आहेत. रोटी घाटातील रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिथे रोड खराब झाला आहे तिथे सुधारणा करण्यात येत आहे. हे काम दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकरे यांनी दिली.
- ई टीव्ही भारतने प्रकाशित केलेली बातमी - पाटस - बारामती मार्ग रोटी घाटात काही ठिकाणी उखडला