ETV Bharat / state

रेमडेसिवीर औषध मिळेना; पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट - remdesivir medicine Chemist Association pune

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात गंभीर, तसेच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गंभीर अवस्थेत असणाऱ्या या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिवीर या औषधीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

remdesivir medicine Chemist Association pune
रेमडेसिवीर मागणी वाढली पुणे
author img

By

Published : Apr 7, 2021, 5:16 PM IST

पुणे - मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात गंभीर, तसेच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गंभीर अवस्थेत असणाऱ्या या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिवीर या औषधीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. हे औषध घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक औषधांच्या दुकानात मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहे.

नागरिकांकडून प्रतिक्रिया घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - शहरात ५ हजार ६०० तर जिल्ह्यात ८ हजार ७५ नवे कोरोना बाधित

काही मोजक्याच औषधांच्या दुकानात मिळणार्‍या या रेमडेसिवीर औषधीसाठी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयातील मेडिकलमध्येही हे औषध उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पुणे शहरात असलेल्या केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात रेमडेसिवीर औषधाचे वितरण सुरू आहे. हे औषध घेण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक या ठिकाणी सकाळपासून गर्दी करत आहेत. कुणाचा भाऊ, कुणाचे वडील, तर कुणाचे इतर नातेवाईक कोरोनामुळे रुग्णालयात भरती असताना त्यांच्यासाठी रेमडेसिवीर औषध घेण्यासाठी नातेवाईक तासनतास याठिकाणी रांगेत उभे आहेत.

मागील वर्षी कोरोनाची तिव्रता वाढली असताना जून ते ऑक्टोबर या कालावधीत रेमडेसिवीर या इंजेक्शनला प्रचंड मागणी होती. त्यावेळी आधार कार्ड आणि डॉक्टरांच्या प्रेस्क्रिप्शनच्या आधारे रुग्णाच्या नातेवाईकांना सहा इंजेक्शन देण्यात येत होते. परंतु, मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला होता. तीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पुण्यात कोरोना संसर्गाची तिव्रता वाढली आहे. त्यामुळे, रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा शहरातील खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे, या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा पावले उचलणे गरजेचे आहे.

हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.