पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात ७८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यांचे वय अनुक्रमे ८५ आणि ६८ असे होते. शहरातील बाधितांची एकूण संख्या ९२१ वर पोहोचली आहे. त्यापैकी, आतापर्यंत ५०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या वाढत चाललेली आहे. आज आढळलेले कोरोनाबाधित हे कस्पटेवस्ती, आनंदनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, जयरामनगर सांगवी, खंडोबामाळ, भोसरी, च-होली ब्रु, रमाबाईनगर, विजयनगर काळेवाडी, अजंठानगर, दिघी, मोरेवस्ती चिखली, अशोकनगर चिखली, साईबाबानगर, पिंपळेसौदागर, बालाजीनगर भोसरी, नढेनगर काळेवाडी येथील रहिवासी आहेत.
दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. हे रुग्ण आनंदनगर चिंचवडस्टेशन, भोसरी, दापोडी, नवीसांगवी, इंदिरानगर चिंचवड, साईबाबनगर चिंचवड, भिमनगर, भारतमाता नगर व नेहरुनगर येथील रहिवासी आहेत.