पुणे : भाजपा सोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत. सरकारच्या बेशिस्तपणामुळेच कोरोना वाढला आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, २० हजार कोटींचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. मात्र, महाराष्ट्र सरकारने राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योपतींना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंबंधी कोणतीही पाऊले उचलली नाहीत. उद्धव ठाकरे हे भाजपशी दोन हात करू इच्छित आहेत. मात्र, कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत. राज्य सरकारच्या बेशिस्तपणाने कोरोना वाढलेला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, देशभरात कोरोनाचे संकट आहे. दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा : पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोनाबाधित ठणठणीत; एकूण बाधितांची संख्या 14 हजार 650