पुणे - राममंदिर देश तोडणारे नाही तर जोडणारे व तुकडे तुकडे संस्कृती विरोधात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरेल, असे मत राममंदिर न्यास विश्वस्तपदी निवड झालेल्या गोविंददेव गिरी महाराज यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, राममंदिर न्यासावर विश्वस्त म्हणून निवड झाली हे माझे परम भाग्य आहे. आता राममंदिर निर्माणाला राम नवमी अक्षय तृतीयेचा मुहूर्त निवडला जाऊ शकतो. लवकरच विश्वस्त मंडळाची बैठक होईल त्यात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गोविंददेव गिरी म्हणाले. राममंदिर निर्माणासाठी 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा - डोळ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.. अन् कट मारला म्हणून त्याचाच डोळा निकामी झाला