ETV Bharat / state

कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा सकारात्मक विचार करू - राजेश टोपे यांचे आश्वासन - Journalist Pandurang Raikar News Update

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या शिष्टमंडळाने टोपे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

राजेश टोपे न्यूज
राजेश टोपे न्यूज
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:09 PM IST

पुणे - राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्वसामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम करीत असतात. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा या क्षेत्रात ग्राह्य धरण्याबाबत येत्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली संघाचे शिष्टमंडळाने राजेश टोपे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याबरोबर पत्रकारही मागे नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा गृहीत धरून 50 लाखांचे विमा कवच जाहीर करावे आणि तसा शासन आदेश निर्गमित करावा. तसेच, पत्रकार पांडुरंग रायकर याला तातडीने 50 लाखांची मदत द्यावी, त्याचबरोबर जे माध्यमांत काम करणारे, पत्रकार कोरोना बाधित झाल्यास त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून मोफत उपचार करावेत आणि त्याबाबतचे तातडीने शासन आदेश काढावेत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.