ETV Bharat / state

मनसेचे पुण्यात दोन दिवसीय शिबीर; मोबाईल नेण्यास पदाधिकाऱ्यांना मनाई - राज ठाकरे न्यूज

पक्ष बांधणीसह इतर विषयांवर राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील कात्रज येथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासाठी, तर शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.

mns pune
मनसेचे पुण्यात दोन दिवसीय शिबीर
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:43 PM IST

Updated : Dec 20, 2019, 2:51 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आजपासून मनसेच्या संवाद शिबीराचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. आज (शुक्रवार) आणि उद्या मनसेचे राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासाठी हे शिबीर असणार आहे. विशेष म्हणजे या शिबीराच्या ठिकाणी येताना मनसेच्या पदाधिकाऱयांना मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

प्रतिनिधी गजानन शिंदे यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - जुन्नरचे नाव 'शिवनेरी' करावे, 'या' आमदाराने केली मागणी

पक्ष बांधणीसह इतर विषयांवर राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील कात्रज येथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासाठी, तर शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांना मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मनसेच्या शिबिराला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Intro:मनसे अध्यक्ष राज ठाकरे संवाद शिबीर ठिकाणी पोहचले..कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

पुण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.आज पासून संवाद शिबीराच आयोजन करण्यात आलाय.आज शुक्रवार आणि उद्या शनिवार या दिवशी मनसेच्या राज्यातील जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,पदाधिकारी यांचं शिबीर पार पडणार आहेत.पक्ष बांधणीसह इतर विषयावर राज ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.पुण्यातील कात्रज येथे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष, यांचं शिबिर तर शनिवारी डेक्कन जिमखाना येथे होणार होणार सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मोबाईल घेऊन बैठकी ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.

Body:- पुण्यात आजपासून होत असलेल्या मनसे शिबिराला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर,राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे उपस्थित...काही वेळात राज ठाकरे शिबीर होत असलेल्या ठिकाणी पोहचणार..Conclusion:...
Last Updated : Dec 20, 2019, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.