ETV Bharat / state

Raj Thackeray On Pune Visit : साहेब तुम्ही बसा मी मागे आहेच', राज ठाकरेंच्या प्रश्नाला वसंत मोरेचे उत्तर

आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर ( Raj Thackeray on Pune Visit ) असताना ते अधिक काळ वसंत मोरे ( Vasant More ) यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांच्या हस्ते धायरी परिसरात मनसे कार्यालयाचे ( Inauguration Public Relations Office in Dhairi ) उद्घाटन करण्यात आले. यावरून राज ठाकरे वसंत मोरे यांच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं सध्या तरी दिसत आहे.

MNS President Raj Thackeray
Raj Thackeray
author img

By

Published : Dec 28, 2022, 7:55 PM IST

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर ( Raj Thackeray on Pune Visit ) आहेत. यामध्ये त्यांनी आज पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयाचे धायरी भागात एका पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे ( Inauguration Public Relations Office in Dhairi ) उद्घाटन केलं. खडकवासला मतदार संघाची जबाबदारी असलेल्या वसंत मोरे ( Vasant More ) यांनी धायरी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या उद्घाटना वेळेचा एक प्रसंग सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनला आहे.

राज ठाकरे वसंत मोरे यांच्यात नाराजी नाही - काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून पक्षातील अंतर्गत बाबी सोशल मीडियावर अथवा माध्यमांच्या समोर बोलल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले होते. हे पत्र वसंत मोरे यांनाच उद्देशून असल्याची पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे राज ठाकरे हे आपल्या लाडक्या शिलेदारावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना ते अधिक काळ वसंत मोरे यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. यावरून राज ठाकरे वसंत मोरे यांच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं सध्या तरी दिसत आहे.

"साहेब तुम्ही बसा मी मागे आहेच - धायरीचे मनसे नेते सचिन पांगरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे आले होते. या कार्यक्रमाची जबाबदारी मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याकडे होती. ज्यावेळेस राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले. त्यावेळेस खुर्चीवर बसायच्या वेळी राज ठाकरे यांनी विचारलं, "खुर्ची व्यवस्थित आहे ना?, मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती." यावर वसंत मोरे यांनी लगेचच राज ठाकरे यांना उत्तर दिलं की, "चंद्रकांत पाटील यांची तुटली होती." वसंत मोरे यांनी हे सांगतात ते राज ठाकरेंना म्हणाले "साहेब तुम्ही बसा मी मागे आहेच," या प्रसंगाची आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

तत्पूर्वी राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले त्यावेळेस त्यांचा भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. भगवी शाल देऊन सत्कार करताच राज ठाकरे म्हणाले "तुम्ही बहुतेक मला आता साधू करूनच सोडणार" राज ठाकरेंच्या या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.