ETV Bharat / state

आंबेगावच्या शाळेत शिरले पावसाचे पाणी, विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय - rain

आंबेगाव तालुक्यात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. या जोरदार झालेल्या पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच शेतात पाणी साचले आहे. काही ठिकाणी शाळांमध्ये पाणी शिरुले होते. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाणी शिरले आहे.

आंबेगावच्या शाळेत शिरले पावसाचे पाणी
author img

By

Published : Jun 28, 2019, 8:36 PM IST

पुणे - आंबेगाव तालुक्यात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. या जोरदार झालेल्या पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच शेतात पाणी साचले आहे. काही ठिकाणी शाळांमध्ये पाणी शिरुले होते. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाणी शिरले आहे. महत्वाचे म्हणजे हे गाव माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दत्तक घेतलेले आहे. जोपर्यंत शाळेचे काम व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.

आंबेगाव तालुक्यात काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाणी साचल्यामुळे आज पालकांनी शाळकरी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शाळेच्या गेटबाहेर विद्यार्थी, पालकांनी मोठी गर्दी केली होती.

आंबेगावच्या शाळेत शिरले पावसाचे पाणी

सध्या मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना वर्गात जाताना अडचण होत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून, तत्काळ गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी अवसरी येथील शाळेस भेट देऊन पालकांशी संवाद साधला. तत्काळ काम चालू करणार असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. शाळेतील पाणी कमी होईपर्यंत पर्याय म्हणून मुलांना मुलीच्या शाळेत बसण्याची व्यवस्था केली आहे.

Intro:Anc__आंबेगाव तालुक्यात कालपासुन पाऊसाने थैमान घातले असताना ओढे नाले,शेतातुन पाणी धुथडी भरुन वाहत होत तर काही भागात शाळांमध्ये पाणी शिरुले होते आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याने पालकांनी जो पर्यंत शाळेचे काम व्यवस्थित होत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे अवसरी खुर्द हे गाव माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी दत्तक घेतलेले आहे

आंबेगाव तालुक्यात काल दुपार नंतर झालेल्या मुसळधार पावसाने अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाणि साचल्यामुळे आज पालकांनी शाळकरी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती,शाळेच्या गेट बाहेर विदयार्थी पालकांची गर्दी झाली होती,

सध्या मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना वर्गात जाताना अडचण होत आहे,परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तात्काळ गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन,यांनी अवसरी येथील शाळेस भेट देऊन पालकांशी संवाद साधून तात्काळ काम चालू करणार असल्याचे सांगितले शाळेतील पाणी कमी होईपर्यंत पर्यायी मुलांना मुलीच्या शाळेत बसण्याची व्यवस्था केली आहे

Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.