पुणे - दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि मोठ्या गर्दीत साजरा होणारा एक जानेवारीचा भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा यंदा घरातूनच साजरा करा, असे आवाहन भीमा कोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आणि देशभरातील आंबेडकरी अनुयायांनी घरातूनच शौर्य दिन सोहळा साजरा करावा, असे आवाहन डंबाळे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. पुणे परिसरात तब्बल 14 हजार पेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारच्या गर्दीने साजऱ्या होणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत. त्यामुळे जेजुरी येथील सोमवती अमावस्या आणि आळंदी येथील कार्तिकी यात्रा तसेच इतरही काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन करा - राहुल डंबाळे
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी शोर्यस्थळावर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आंबेडकरी अनुयायांनी घरातून शौर्यदिन सोहळा साजरा करावा असे आवाहन करण्यात आला आहे.