ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकणे, हे सरकारला पटते का? - अजित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. सरकार बोलायला तयार नाही. एवढेच नव्हे तर, शेतकऱ्यांनी पुढे येऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले जात आहे. सरकारला जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

author img

By

Published : Feb 6, 2021, 5:04 PM IST

Updated : Feb 6, 2021, 9:58 PM IST

Ajit Pawar Comment on Central Government
अजित पवार

पुणे - शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला आज दिल्लीच्या सीमेवर रोखले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही. १४ ते १५ बैठकीच्या फेऱ्या झाल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडी सोसत शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र, यावर सरकार बोलायला तयार नाही. एवढेच नव्हे तर, शेतकऱ्यांनी पुढे येऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले जात आहे. सरकारला जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा - अजित पवार यांच्या हस्ते सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वितरण

इंदापूर येथे आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांनाच मोर्चे, आंदोलने करण्याचा अधिकार आहे. अनेकदा असे आंदोलन पोलिसांना सावरण्यास अडचणी येत असल्यास अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात, पाण्याचा मारा केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे मारणे, हे सरकारला पटण्यासारखे आहे का?

देशात लोकशाही असताना केंद्राची ठोकशाहीची भूमिका

शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य विरोधी पक्षातील खासदार गेले असता त्यांनाही रोखण्यात आले. देशात लोकशाही असतानाही केंद्र सरकार ठोकशाहीची भूमिका घेत असल्याचा आरोप पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. तो शेतात राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो, मात्र याबाबत केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याऐवजी त्यांच्या वाटेत खिळे ठोकण्याचे काम करत आहे. माध्यमांनी जेव्हा हा प्रकार समोर आणला तेव्हा केंद्राने नाईलाजास्तव रस्त्यावरील खिळे काढून टाकले, असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा आदर्श मॉडेल म्हणून उभी करा- अजित पवार

Last Updated : Feb 6, 2021, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.