ETV Bharat / state

पुण्यातील 'बीआरटी'वरून वाद; वाहतूक कोंडीवरून पोलीस आयुक्तांच्या 'त्या' पत्राला PMPMLA चे प्रत्युत्तर

शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असताना त्यावर महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. रोज पुणेकर वाहतूक कोंडीत अडकतात. त्याचे खापर वाहतूक पोलिसांवर फोडतात. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद करा, अशी विनंती केली होती.

pune traffic
पुणे बीआरटी
author img

By

Published : Nov 4, 2022, 4:57 PM IST

पुणे : शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असताना त्यावर महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. रोज पुणेकर वाहतूक कोंडीत अडकतात. त्याचे खापर वाहतूक पोलिसांवर फोडतात. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद करा, अशी विनंती केली होती. पीएमपीएमएल प्रशासनाने देखील मनपा आयुक्तांना पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद न करता वाहतूक नियमन योग्य पद्धतीने झाले आणि वाहनाच्या पार्किंगची सुविधा केली तर हा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, असे सांगण्यात आले आहे.

बीआरटीमुळे वाद - पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड येथील बी आर टी मार्ग अस्तित्वात आहे. मात्र तेथे वाहतूक कोंडी होत नाही .पिंपरी चिंचवड येथील सुरू असलेला बीआरटी मार्ग योग्य पद्धतीने बांधण्यात आला असल्याने, तिथं ही समस्या निर्माण होत नाही. पुण्यात मात्र अनेक ठिकाणी अडथळे असल्याने थोडे समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले .पिंपरी चिंचवड प्रमाणे कात्रज ते स्वारगेट मार्गावरील मार्ग व्यवस्थित असतो. सध्या सुरू असलेल्या विकास कामामुळे अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.

पीएमपीएमएलची प्रतिक्रिया - पीएमपीएमएलने देखील बीआरटी सुरू ठेवण्यासंदर्भात पत्र दिले आहे. प्रवाशांना पीएमपीची जलद सेवा द्यायची असेल, बीआरटी सुरूच पाहिजे.पण ट्राफिकचा विचार करता बीआरटी मार्गातून एसटी बस, स्कूल बस आणि अत्यावशयक सेवेतील वाहने सुरू करण्यास काही अडचणी नाही. ही भूमिका कळवली असल्याचे पीएमपीएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.