पुणे - सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. राज्यात उशिरा का होईना पण थंडीची तीव्रता वाढताना दिसत आहे. त्यातच पुणे तिथे काय उणे अस बोलले जाते. थंडीची चाहूल लागताच येथील सारसबागच्या गणपती बाप्पाला स्वेटर परिधान करण्यात आले आहे.
बाप्पाने स्वेटर परिधान केल्यानंतर बाप्पाचे रुप बघण्यासाठी शहरवासियांनी एकच गर्दी केली. दरवर्षी थंडी सुरु झाल्यानंतर सारसबागेतील गणपतीला स्वेटर परिधान करण्यात येते. या गणपतीला तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा - लोकबिरादरीची निरंतर सेवा.. आदिवासींमध्ये राहून त्यांच्यासाठी ४६ वर्षांपासून राबतेय आमटे कुटुंब