पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. रांका ज्वेलर्सच्या एक कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात रांका ज्वेलर्सचे विविध भागात शाखा आहेत. यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत दहा सप्टेंबर २०२० ते सात फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अनोळखी व्यक्तींच्या नावावर बिल : अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल म्हणून काम करत आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर व्यवस्थापकांची बनावट सह्या करून ते अनोळखी व्यक्तींच्या नावावर बिल त्यांनी तयार केले आहे. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले आहे. धकाकदायक बाब म्हणजे दोघांनी वेळोवेळी एक कोटी सहा लाख ३५ हजार ७२५ रुपये काढले आहे.
बनावट सही करुन फसवणूक : यानंतर या दोघांनीही एक विशेष योजना केली, तू म्हणजे यांनी एकाने महिनाभराच्या अंतराने नोकरी सोडून दिली. तर दुसऱ्याने परत महिनाभराच्या अंतराने नोकरी ही सोडली आहे. या दोघांनी असे केल्याने व्यवस्थापक यांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली. तेव्हा धनादेशावर त्यांची बनावट सही असल्याचे आढळून आली. तेव्हा त्यांनी लगेच गेल्या दोन वर्षातील संपूर्ण हिशोब तपासला. त्यावेळी दोघांनी देशपांडे (व्यवस्थापक ) यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर देशपांडे यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन आता पोलीस तपास करत आहेत.