पुणे - कोरोनाबाबतचे नियम सर्वांनी पाळणे अतिशय गरजेचे असून अन्यथा राज्यात या आजारामुळे हाहाकार माजेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मास्क वापरून कोरोना दूर ठेवण्याबाबतचे आवाहन करण्यासाठी पुणे पोलिसांकडून एक व्हिडिओ शेअर केला आहे. मास्क न घालण्यासाठी अनेक कारणे लोक सांगत असतात. मात्र, हा व्हिडिओ पाहून कोणाकडे काही कारण शिल्लक राहील असे वाटत नाही.
-
‘It’s feels so hot, can’t wear this mask’ - If you have used these words recently, then this video is for YOU.#WearAMask #COVIDSecondWave #coronavirus pic.twitter.com/9qKjXPCvLw
— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">‘It’s feels so hot, can’t wear this mask’ - If you have used these words recently, then this video is for YOU.#WearAMask #COVIDSecondWave #coronavirus pic.twitter.com/9qKjXPCvLw
— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 4, 2021‘It’s feels so hot, can’t wear this mask’ - If you have used these words recently, then this video is for YOU.#WearAMask #COVIDSecondWave #coronavirus pic.twitter.com/9qKjXPCvLw
— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 4, 2021
'मास्क घातल्यावर खूप गरम वाटते, त्यामुळे मी मास्क घालू शकत नाही, मास्क न घालण्यासाठी तुम्ही हे शब्द नुकतेच वापरले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, असे लिहून पुणे पोलिसांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हात, डोळ्यांनी अपंग असलेले लोकही कशी मास्क घालत आहेत, हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणी मास्क न घालण्याचे कारण देऊ, नये असा संदेश त्यांनी व्हिडिओमधून दिला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थिती अतिशय बिकट झाली असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपासून संसर्ग कमी होत गेल्याने नागरिकांनी कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले. कोरोना गेल्याच्या अविर्भावात सर्वजण दिसून आले. मात्र, कोरोना आता पूर्वीपेक्षा वेगाने वाढत असून नागरिकांनी मास्क घालण्यासह कोरोना नियम पाळणे गरजे आहे.
हेही वाचा - उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू
हेही वाचा - वाढत्या कोरोनाबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताहेत डॉ. तात्याराव लहाने