पुणे: पोलीस म्हटल की, समाजात पोलिसांच्या प्रती एक वेगळीच ओळख आहे. पण कोणताही सण असो, या वार असो, हे सगळ विसरून नागरिकांच्या संरक्षणासाठी कायम उभे राहणारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करून एक अनोखं आदर्श तयार करण्यात आलं आहे.
दिवाळी पाडवा पोलीस स्टेशनमध्ये साजरा: पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या संकल्पनेतून पुणे स्टेशन परिसरातील मानसिक दृष्ट्या विकलांग असलेले फिरस्ते यांना बंडगार्डन पोलीस स्टेशन BUND GARDEN POLICE STATION या ठिकाणी आणून त्यांना उटणे लावून, गरम पाण्याने अंघोळ घालून, त्यांना नवीन कपडे देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांना मिठाई वाटून, त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच यावेळी या लोकांना गोड जेवण देखील देण्यात आले आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने दिवाळी आणि दिवाळी पाडवा पोलीस स्टेशनला साजरा करण्यात आला.
या लोकांबरोबर दिवाळी साजरी: कोणताही सण किंवा उत्सव काळात घरच्यां बरोबर ते सण उत्सव साजरा न करता नागरिकांच्या सेवेसाठी कायम पोलीस हे रस्त्यावर असतात. आज शहरात रस्त्यावर अनेक ज्येष्ठ नागरिक, अनेक लोक मंदिरांच्या बाहेर, तसेच रस्त्याच्या कडेला बसलेले आपण पाहत असतो. पण या लोकांची देखील दिवाळी गोड व्हावी, म्हणून बंडगार्डन पोलिसांनी BUND GARDEN POLICE अशा या लोकांबरोबर दिवाळी साजरी करताना या लोकांच्या चेहेऱ्यावर एक आनंद पाहायला मिळालं आहे.