पुणे - पुण्यातील येरवडा तुरुंगामध्ये खुनाच्या घटनेत अटकेत असलेल्या एके उर्फ आकाश कुंचले याच्या वाढदिवसानिमित्त पाच फेब्रुवारीला तुरुंगाबाहेर बाहेर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडून आतषबाजी केली होती. इतकेच नाहीतर त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत पोलिसांनाच आवाहन दिले होते, या घटनेमध्ये गुंडाची टोळकी दहशत माजवू पाहत होती, मात्र या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आकाश कुंचले याच्या दोन समर्थकांना बेड्या ठोकल्या आहेत.
चार जण अद्याप फरार
पाच फेब्रुवारीला रात्री 12 वाजता पाच ते सहा जणांनी येरवडा तरुंगाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली होती, या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असली तरी चार जण अद्याप पोलिसांच्या हाती लागेलेले नाहीत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसात पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा सहभाग हा चिंताजनक आहे.