पुणे - कोरोना विषाणुविरुद्ध लढण्यात जोमाने पुढे असणाऱ्या डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे वतीने पुणे शहर आणि जिल्ह्यातील १५ हजार डॉक्टरांना फेसशिल्ड देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ.सुनील जगताप अध्यक्ष महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, प्रदीप धुमाळ, श्रीमती अमृता बाबर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे राज्यात दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थेमधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे.
'कोरोना विषाणुच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे. पुण्यात १६ वैद्यकीय संघटनांमार्फत फेसशिल्डचे वितरण करण्यात आले', असे डॉ.सुनील जगताप यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन, गायनाकॉलॉजी असोसिएशन, हडपसर डॉक्टर्स असोसिएशन, डेंटिस्ट असोसिएशन, मार्ड, पीडीए, ऑर्थोपेडीक असोसिएशन, ऑप्थल्मेलॉजिकल असोसिएशन, शहर काँग्रेस डॉक्टर्स सेल, जैन मेडिकल असोसिएशन, ईएनटी डॉक्टर्स असोसिएशन अशा पुण्यातील १६ वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वितरण करण्यात आले.